डोक्याखाली उशी घेतल्यामुळे अनेक शारीरिक तक्रारी उद्भवू शकतात.
अनेक जणांना झोपतांना डोक्याशी उशी घेण्याची सवय असते. काही जणांना तर उशीशिवाय जराही झोप येत नाही.
डोक्याखाली उशी घेतल्यामुळे अनेक शारीरिक तक्रारी उद्भवू शकतात. म्हणूनच, उशीमुळे उद्भवाऱ्या समस्या कोणत्या ते पाहुयात.
उशीचा वापर केल्यामुळे मान आणि पाठ यांच्यावर ताण येतो. त्यामुळे पाठदुखी किंवा मानदुखीची समस्या निर्माण होते.
उशीचं कव्हर बऱ्याचदा न धुतल्यामुळे त्याच्यावर धुलीकण जमा होतात. यांचा संपर्क झोपतांना चेहऱ्याशी येतो. ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.
जेव्हा आपण उशीचा वापर करतो तेव्हा आपल्या पाठीच्या कण्याची स्थिती बदलते. अशात सतत पाठीदुखीची समस्या होऊ लागते.
उशी डोक्याखाली घेऊन झोपल्याने अनेकदा काहींना थकवा जावणतो. याचा अर्थ झोप चांगली आणि पुरेशी झोप होत नाही.