सुंदर साजिरा श्रावण महिना आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे..
श्रावण म्हणजे व्रतवैकल्ये आणि उत्सवांचा महिना.. या महिन्यात धरणी मातेनेही हिरवागार शालू पांघरलेला असतो..
त्यामुळेच श्रावणातल्या सणवारांसाठी तुम्हीही हिरव्या रंगाची साडी नेसून असा सुंदर थाट करू शकता..
हिरव्यागार रंगाचे सौंदर्यच वेगळे.. हिरवा आणि लाल हे रंग आपल्याकडे शुभ मानले जातात.
त्यामुळेच तर श्रावणातल्या व्रतवैकल्यांसाठी अशी एक तरी हिरवी साडी आपल्याकडे असायलाच हवी..
हिरव्यागार पैठणीचे सौंदर्य तर आणखीनच लोभस आणि मोहक..
श्रावणानिमित्त हिरव्या रंगाच्या साड्यांचे असे कित्येक प्रकार बाजारात आलेले असतात..
म्हणूनच हिरवी साडी घ्यायची असेल तर ही वेळ अगदी योग्य आहे.. .