कल्याणच्या चुलबुलीचं ग्लॅमरस फोटोशूट

शिवाली परबच्या लेटेस्ट फोटोशूटनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे शिवाली परब. सध्याच्या घडीला तिला कोणत्याही परिचयाची गरज नाही.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करते आहे. विशेष म्हणजे उत्तम विनोदशैलीसोबतच तिच्या सौंदर्यामुळे आज ती अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे.

शिवाली परबने नुकतेच स्कर्ट टॉपमध्ये फोटोशूट केलंय. यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.

शिवाली परबच्या या फोटोला चाहत्यांची पसंती मिळते आहे. फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.

शिवालीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये येण्यापूर्वी अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.

सुरुवातीला शिवालीने ‘हृदयात वाजे समथींग’ या मालिकेमध्ये काम केले आणि त्यानंतर ती ‘बँक बँचर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Click Here