शिल्पा शेट्टीचा राजस्थानी लूक चर्चेत
शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. प्रोफेशनल लाइफ व्यतिरिक्त ती तिच्या फिटनेसमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच तिने राजस्थानी लूकमध्ये फोटोशूट केलंय. तिच्या या फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
या फोटोशूटमध्ये शिल्पाने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. त्यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
गुलाबी लेहंग्यावर तिने कपाळावर टिकली, केसात मांगटीका, गळ्यात चोकरचा नेकलेस घालून लूक पूर्ण केलाय.
शिल्पा शेट्टीच्या या राजेशाही लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे.
शिल्पा शेट्टी फारशी सिनेइंडस्ट्रीत काम करत नसली तरी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत येत असते.