शिल्पा शेट्टीच्या माेत्याच्या ब्लाऊजचा वेगळाच नखरा..

वेगवेगळ्या आकाराचे मोती जडवण्यात आलेलं अतिशय सुंदर ब्लाऊज घातलेली शिल्पा शेट्टी...

शिल्पाने तिचे हे काही फोटो नुकतेच सोशल मीडियावर शेअर केले असून ते चांगलेच व्हायरल झाले आहेत...

हे ब्लाऊज अतिशय आकर्षक असून शिल्पाने ते अतिशय उत्तम पद्धतीने कॅरी केलेलं आहे.

दिवाळीनिमित्त आयोजित एका पार्टीसाठी तिने हा आकर्षक लूक केला होता.

या मोत्याच्या ब्लाऊजवर तिने चमकदार पांढऱ्या रंगाची प्लेन साडी नेसली होतील. 

गळ्यात पांढरे खडे असणारं नाजूक गळ्यातलं आणि कानात मोती आणि खड्यांचे स्टड हे दागिने तिच्या सौंदर्याला चार चाँद लावून गेले.

केसांचा उंच हेअरबन घातल्याने शिल्पा अतिशय आकर्षक दिसत होती. 

Click Here