मलासना पोझ किंवा गार्लँड पोझ हा योगाच्या सुलभ पण प्रभावी आसनांपैकी एक आहे.
मलासना पोझ किंवा गार्लँड पोझ हा योगाच्या सुलभ पण प्रभावी आसनांपैकी एक आहे. शिल्पा शेट्टीने या पोझचे फायदे सांगितले आहेत.
या आसनात पाय हिपच्या रुंदीइतके उभे करायचे आणि पाऊल थोड्या बाहेर काढून ठेवायच्या असतात. पाठीचा कणा सरळ ठेवून उभे राहायचे.
गुडघे वाकवून हिप जमिनीपाशी आणताना गुडघ्यांमध्ये अंतर हिपच्या रुंदीपेक्षा जास्त करायचे असते.
हात एकत्र करून कोपरांनी आतल्या मांडीना दाब द्यायचा आणि छाती खुली ठेवायची असते. नंतर काही सेकंद ही स्थिती धरणे आणि परत उभे राहणे आवश्यक असते.
या आसनामुळं हिप्सची चांगली हालचाल, स्नायूंना लवचीकता, शरीराची मजबुती आणि स्थैर्य वाढणे यांचा समावेश होतो.
शिल्पा शेट्टीने चाहत्यांना हा पोझ करून हाताचा वापर न करता उभे राहण्याची चॅलेंज दिले होते.
शिल्पाने या आसनामुळे यामुळे शरीरातील हालचाल सुधारते आणि ही एक महत्त्वाची मोबिलिटी मूव्ह आहे, असे सांगितले आहे.