आयशा टाकिया सध्या कुठे असते? आणि काय करते? पाहा तिचे नवे रुप.
आयशा टाकिया एकेकाळी फार नावाजलेले नाव होते. दिसायला सुंदर आणि अगदी फिट असल्यामुळे आयशावर अनेक जण फिदा होते.
आयशाचा जन्म एका गुजराती परिवारात १९८६ साली झाला. आयशाचा जन्म महाराष्ट्रात झाला. ती मुंबईचीच आहे.
वयाच्या १३व्या वर्षी फाल्गूनी पाठकच्या 'चुनर उड जाये' या गाण्यातून आयशाने तिच्या करियरला सुरवात केली होती.
टार्जन - द वंडर कार हा चित्रपट २००४ साली फार गाजला होता. नंतरही टिव्हीवर कायम दिसायचा. त्यात आइशाने काम केले होते. तिथून ती नावारुपाला आली.
त्यानंतरही आयशाने काही चित्रपटांमध्ये काम केले मात्र २००९ साली सलमान खान सोबतचा तिचा वॉन्टेड चित्रपट फार लोकप्रिय ठरला. बॉलिवूडमध्ये आयशाचे नाव या चित्रपटामुळेच झाले.
वयाच्या २३ व्या वर्षी आयशाने फरहान आजमी याच्याशी लग्न केले. तिने स्वत:हून धर्म परिवर्तन करुन घेतले.
२०१३ मध्ये आयशाने मिकाइल याला जन्म दिला. आयशाने चित्रपटांमध्ये काम करणे बंद केले आहे. ती सध्या फक्त परिवारालाच महत्व देते.