दुधाची चव आणि पोषण वाढवणारे ६ पदार्थ

 दुधाची ताकद वाढवण्यासाठी तसेच चव वाढवण्यासाठी हे पदार्थ मदत करतात.

लहानपणी झोपण्यापूर्वी दूध पित होतात ना? झोप अगदी शांत आणि छान लागायची. मात्र दूध प्यायला मुलं कटकट करतात.

दूध पिणे आरोग्यासाठी फार चांगले असते. दुधात अनेक पोषणसत्वे असतात. दुधाची ताकद वाढवण्यासाठी तसेच चव वाढवण्यासाठी हे पदार्थ मदत करतात.

कोको पावडर दुधाची चव वाढवते. तसेच कोको पावडर आरोग्यासाठी वाईट नाही मात्र साधीच वापरायची फ्लेवर असलेली नाही. 

दूध व हळद हे मिश्रण आपण वर्षानुवर्षे पित आहोत. हळदीचे दूध ताप, खोकला असे आजार दूर ठेवण्यात मदत करते. 

जायफळ घातलेले दूध लहानांबरोबर मोठ्यांसाठीही फायद्याचे ठरेल. झोप शांत लागेल. 

गुलकंद घातलेले दूध उन्हाळ्यात प्यायलाच हवे. पोटाला थंडावा मिळतो. चव छान असल्याने सगळे आवडीने पितात. 

काजू बदामाची पूड घातलेले दूध चवीला फार छान लागते. गार करुन प्यायल्यावरही छानच लागते. पौष्टिक असते. 

Click Here