सावली म्हणजेच प्राप्ती रेडकरचे पारंपारिक लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय
'सावल्यांची जणू सावली' मालिकेत सावलीची भूमिका अभिनेत्री प्राप्ती रेडकरने साकारली आहे.
प्राप्ती रेडकरला सावलीच्या भूमिकेतून घराघरात चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
प्राप्ती रेडकर सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने काही फोटो शेअर केले आहेत.
प्राप्तीने साडीतले फोटो शेअर केले आहेत. यात तिने पारंपारिक साज श्रृंगार केला आहे.
कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात चोकर नेकलेस, हातात हिरव्या बांगड्या या गेटअपमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
प्राप्ती रेडकरच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.