गुलाबी रंगात
सजली सावली

'सावली'च्या भूमिकेतून ती घरोघरी पोहोचली आहे.

'सावळ्याची जणू सावली' मालिका म्हटलं की अभिनेत्री प्राप्ती रेडकर डोळ्यासमोर येते.

'सावली'च्या भूमिकेतून ती घरोघरी पोहोचली आहे. प्रेक्षकांचंही तिला भरपूर प्रेम मिळतंय.

प्राप्ती रेडकरने याआधी काही मालिकांमध्येही काम केलं आहे. 

'किती सांगायचंय मला','तू माझा सांगाती','मेरे साई' आणि 'काव्यांजली'मध्ये ती दिसली आहे.

प्राप्तीने अभिनय कौशल्यातून तर सर्वांचं मन जिंकलंच आहे. तसंच ती उत्तम डान्सरही आहे.

नवरात्रीनिमित्त प्राप्तीने गुलाबी रंगाच्या नववारी साडीत फोटोशूट केलंय. यात साडीवर प्राप्तीने गोल्डन ज्वेलरी घातली आहे. केस मोकळे सोडले आहेत. कपाळावर चंद्रकोर टिकली लावली आहे.

या फोटोशूटमध्ये प्राप्ती खूपच सुंदर दिसते आहे. प्राप्तीच्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 

नेटकऱ्यांनी अतिशय गोड, खूपच सुंदर, सुंदर सावली अशा कमेंट्स केल्या आहेत. 

Click Here