संयमी खेर फक्त सुंदरच नाही तर उत्तम खेळाडूही आहे. पाहा तिची कामगिरी.
'घुमर' या चित्रपटातून स्वत:ची अभिनय क्षमता सिद्ध करणारी संयमी खेर ही फक्त भारतीय चित्रपट क्षेत्रातीलच नाही तर फिटनेस क्षेत्रातीलही एक नामवंत महिला आहे.
संयमी खेर हिला आयर्नमॅन म्हणणे अगदीचे योग्य ठरेल कारण तिने २०२४ मध्ये जर्मनीत झालेल्या आयर्नमॅन ७०.३ ट्रायथलॉनमध्ये भाग घेतला आणि यशही मिळवले.
ही स्पर्धा तशी फार कठीण असते. या स्पर्धेत १.२ किमी पोहावे लागते. नंतर ९० किमी सायकलिंग करायचे आणि मग २१.१ किमी धावल्यावर स्पर्धा पूर्ण होते.
ही स्पर्धा पूर्ण करणारी संयमी ही पहिली भारतीय महिला अभिनेत्री आहे. या कामगिरीसाठी सगळ्यांनाच तिचे फार कौतुक आहे.
जर्मनीतील यशानंतर संयमी थांबली नाही. ती सध्या आयर्नमॅन ७०.३ युरोपियन चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी तयारी करत आहे.
संयमी नाशिकची आहे. सध्या ती मुळ गावीच राहत आहे. पुढील वाटचालीसाठी ती नाशिकमध्येच तयारी करत आहे.
संयमीची ही कामगिरी फक्त वैयक्तिक क्षमता दाखवत नाही. तर महिलांना अशा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रेरणादायी ठरते.