इतके वर्षांचा प्रेमाचा सहवास असाच का संपला? सायना नेहवालचा व्हिडिओ व्हायरल.
भारताची उत्कृष्ट बॅडमिंटन पट्टू सायना नेहवाल अनेक मुलींची प्रेरणा आहे. सायनाने भारताचे नेतृत्व अनेक सामन्यांमध्ये केले.
२०१५ मध्ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने सायना नेहवालला पहिल्या क्रमांकाने गौरवले. जगातून सायनाची रँक पहिली होती. हा क्रमांक गाठणारी सायना पहिलीच भारतीय महिला होती.
बॅडमिंटनमुळेच सायना आणि परुपल्ली कश्यप यांची भेट झाली. कश्यप भारतातील एक प्रसिद्ध आणि उत्कृष्ट बॅडमिंटन खेळाडू आहे. सायना आणि कश्यप यांची प्रेमकहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी होती.
पुलेला गोपीचंद अकादमी मध्ये दोघेही एकत्र सराव करायचे. सरावा दरम्यान मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २०१८ साली त्यांनी लग्न केले.
२०१५-१६ साली त्याआधी आणि त्यानंतरही दोघे फार लोकप्रिय तसेच उत्कृष्ट खेळाडू होते. जगभरातून त्यांचे नाव गाजत होते. विजय पराभव दोन्ही दोघांनी एकत्र पचवले.
सायना आणि कश्यप दोघांचेही ध्येय एकच होते आणि त्यामुळे त्यांनी एकमेकांना कायम सांभाळून घेतले. सायना लहान असूनही माझ्यासाठी एक आदर्श खेळाडू आहे असे कश्यप कायम सांगायचा.
त्यांच्या लग्नाला आता सात वर्षे झाली असून त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय चाहत्यांसाठी फारच धक्कादायक ठरला. त्यांना एक आदर्श जोडी म्हणून ओळखले जायचे.
अचानक असे काय घडले की दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला असे प्रश्न सोशल मिडियावर विचारले जात आहेत. मात्र आम्हाला आमची प्रायव्हसी द्या असे म्हणत सायनाने घटस्फोटाची बातमी सांगितली.