रिंकू राजगुरूचे फोटो पाहून चाहते झाले सैराट
अभिनेत्री रिंकू राजगुरू मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
'सैराट' या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ती रातोरात सुपरस्टार झाली.
नुकताच रिंकूला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात कै. स्मिता पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यासाठी रिंकूने ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली होती आणि त्यावर पीच रंगाचा ब्लाउज परिधान केला होता.
गळ्यात हेवी ज्वेलरी घातली होती. केसांचा आंबाडा बांधून गजरा माळला होता.या लूकमध्ये रिंकू राजगुरु खूपच सुंदर दिसत आहे.