रेखाच्या अदांवर सारेच फिदा!! फॅशनची राणी आणि नव्या ट्रेंड वेळेच्याआधीच फॉलो करणारी अभिनेत्री.
आजकाल आपली लाडकी अभिनेत्री सगळीकडे सुंदर अशा साड्यांमध्येच दिसते. मात्र तरुणवयात असताना रेखानी हॉट, बोल्ड, संस्कारी असे सगळे लुक्स करुन चाहत्यांना वेड लावले होते.
रेखाचे काही पेहराव आजही लोकांच्या लक्षात आहेत. काळाच्या पुढचा विचार करणारी अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी फार पूर्वीच आयकॉनीक असे फॅशनचे नमुने दिले आहेत.
सध्या ऑफ शोल्डर टॉप हा प्रकार फार चालतो. ही फॅशन फार प्रसिद्ध नसतानाच्या काळात रेखा ऑफ शोल्डर टॉप्समध्ये दिसायची.
फक्त साधी टिकली लावूनही सुंदर दिसता येते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रेखा. पांढरी साडी आणि फॅशनेबल ब्लाऊज ही सध्या लोकप्रिय असलेली फॅशन रेखाने फार आधीच केली होती.
रेखाचे रेड हॉट साडी लूक तर कोणी विसरणार नाही. मोकळे केस आणि स्लिव्ह्जलेस ब्लाऊज असा रेखाचा पेहराव एकदम बोल्ड होता.
मोकळे केस आणि सिंपल डेनिम शर्ट . उफफ !! साधे कपडेही सुंदर आणि हॉट दिसतात हे रेखाकडे पाहून पटते.
भारतीय पेहरावात रेखाचा हात कोणी धरणार नाही. सुंदर म्हणावे की हॉट असा प्रश्न सगळ्यांनाच पडेल.
रेखा कायमच बॉस लेडी होती आणि आजही आहे. टायगर प्रिंट आजकाल प्रसिद्ध आहे. मात्र प्रसिद्ध नसताना त्याची फॅशन करणारी म्हणजे रेखाच.
साधा टीशर्ट आणि मोकळे केस हा महिलांचा साधा रोजचा लूकही सुंदरच आहे. हे सिद्ध करणारा रेखाचा पेहराव नक्कीच महिलांना आपलासा वाटेल.