सिंपल साध्या रत्नाची भूमिका करणारी खुशबू खऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर आहे.
क्रिमिनल जस्टीसचा ४था सिजन सध्या हिट होत आहे. पंकज त्रिपाठीचे काम कायम लोकप्रिय ठरतेच मात्र क्रिमिनल जस्टीसमध्ये फक्त पंकज त्रिपाठी नाही तर त्यांची आणि रत्नाची जोडी फार गाजली.
सिरीजमध्ये अगदी सिंपल रुपमध्ये दिसणारी रत्ना मिश्रा खऱ्या आयुष्यात प्रचंड स्टाईलिश आणि सुंदर आहे.
सिरीजमधील रत्नाचे खरे नाव खुशबू अत्रे आहे. मध्य प्रदेशमधील बरवाहा या ठिकाणची रहिवासी आहे. आई, वडील आणि भाऊ असा त्यांचा लहानसा परिवार आहे.
खुशबूला लहानपणापासूनच अभिनय करायची आवड आहे. तिच्या कारकिर्दीची सुरवात तिने नाटकात काम करुन केली. त्यानंतर तिने अनेक ऑडिशन दिल्या.
२०१२ साली फार गाजलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेत तिला काम करायची संधी मिळाली. अगदी लहान भूमिका तिने साकारली.
राजी, अकीरा, वोडका अशा काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये खुशबूने लहान लहान भूमिका निभावल्या. हळूहळू काम मिळू लागले.
नंतर तिने ओटीटीवर काम करायला सुरवात केली. मिळतील त्या भूमिका करत स्वत:ची ओळख तयार केली.
तिच्या अभिनय कौशल्यामुळे खुशबूला क्रिमिनल जस्टीसमध्ये काम करण्यासाठी ऑफर मिळाली. त्या भूमिकेमुळे तिला ओटीटीवरील एक उत्कृष्ट कलाकार म्हणून प्रसिद्धी मिळाली.
खुशबू दिसायला फार सुंदर आहे. तिचे इंस्टाग्रामवरील फॅन्सही वाढले आहेत. खऱ्या आयुष्यात अत्यंत स्टाईलिश असलेली खुशबू साध्या सिंपल रत्नाची भूमिका छान निभावते.