'छावा' फेम अभिनेत्रीने चाहत्यांना खुशखबर दिली आहे.
सगळ्यांच्या मनात घर केलेली अभिनेत्री रश्मिका मंदाना आता स्नॅपचॅटवर आली आहे.
ती तिच्या स्टोरीज, स्नॅप्स आणि स्पॉटलाइटमधून आपल्याला तिच्या आयुष्यातील खास क्षण दाखवणार आहे.
ती कधी गाडीत नाचताना दिसेल, कधी शूटिंगचे मागचे क्षण दाखवेल, तर कधी आपल्या लाडक्या कुत्र्याशी गोड मस्ती करताना. त्यामुळे तुमचं स्नॅप्स फीड आणखी रंगतदार होणार आहे.
रश्मिका म्हणाली, मला नेहमी एक अशी जागा हवी होती जिथे मी खरी आणि थोडी मस्तीत असलेली रश्मिका दाखवू शकेन. आता मी इथे आहे, स्नॅपचॅटवर.
आता मी माझे सेटवरील खास क्षण, छोटे आनंदाचे प्रसंग, आणि मजेदार गोष्टी शेअर करणार आहे, हे बघत असाल, तर तुमचं खूप खूप आभार, असेही रश्मिकाने म्हटले.
अभिनेत्रीने पुढे म्हटले, तुम्ही नेहमी माझ्यासोबत होता, आणि आता पुढचं प्रवासही तुमच्यासोबतच करायचं आहे. लवकरच भेटू, माझ्या लाडक्यांनो.