राणीच्या फॅशनला तोड नाही. साधेपणातही सौंदर्य. राणीचे लोकप्रिय लूक्स.
राणी मुखर्जी आजही अगदी सुंदर आणि फीट आहे. मात्र एकेकाळी राणीच्या फॅशनचे चाहते दिवाने होते. तिच्यासारखे कपडे विकत घेण्यासाठी मुली दुकानांसमोर रांगा लावायच्या.
सगळ्यात जास्त राणीने घातलेले मॉडर्न लेहेंगे गाजले. देसी आणि विदेसी स्टाईल मिक्स करुन तयार केलेले हे ड्रेस आजही डिमांडमध्ये आहेत.
सगळ्याच चित्रपटांमध्ये टिपिकल कॉलेज गर्ल लूक राणीने एकदम मस्त निभावला होता. ती कायमच सिंपल आणि हॉट दिसायची.
मिनी स्कर्टची फॅशन आजकाल फार पाहायला मिळत नाही. मात्र ९०s मध्ये सगळ्यांनी ही फॅशन करण्याचा प्रयत्न केला होता. राणीही अनेदका अशा ड्रेसमध्ये दिसायची.
साधा ड्रेस आणि मोकळे केस ये कॉम्बिनेशन अनेक जणींनी केले असले तरी राणीचा हा नीळा ड्रेस आजही लोकप्रिय आहे.
डंग्रीची फॅशन पूर्वी फार लोकप्रिय होती. आजही आहे. डंग्री फार सुंदर दिसते. सैलही असते. त्यामुळे त्वचेसाठी चांगली.
हम तूम मधील राणीचा स्कर्ट टॉप विसरुन अजिबात चालणार नाही. तिच्या या ड्रेसची चर्चा फारच जोरदार झाली होती.
बंटी और बबलीमधील राणीचा लूक आजही रिक्रिएट केला जातो. शर्ट-पंजाबी ड्रेस सगळ्याचे मिश्रण असलेले तिचे कुर्ते फार गाजले होते.
साध्या पंजाबी ड्रेसची फॅशन जास्त पाहायला मिळत नाही. राणी या लाल ड्रेसमध्ये फारच सुंदर दिसत होती.