देसी गर्ल प्रियांकाचा पारंपरिक लूक, साधेपणात सुंदरता 

प्रियांका चोप्राचा सुंदर लूक पाहून सारे झाले अवाक!!  पारंपरिक ड्रेसमध्ये दिसते फारच भारी. 

सध्या सगळीकडे चर्चेत असलेले Globe Trotter हे एस.एस. राजामौली दिग्दर्शित येणार्‍या आगामी चित्रपटाचे कोड-टायटल आहे.

या चित्रपटाचे महेश बाबू, प्रियांका चोप्रा आणि पृथ्वीराज सुकुमारन हे मुख्य कलाकार आहेत. चित्रपटासाठी आयोजित केलेल्या इव्हेंटमध्ये सगळ्यांचे लक्ष प्रियांकाने वेधून घेतले. 

प्रियांकाला देसी गर्ल का म्हणतात हे तिचा या इव्हेंट वेळीचा लूक पाहून नक्कीच समजेल. प्रियांकाने घातलेला पारंपरिक ड्रेस फारच सुंदर होता. 

प्रियांकाच्या लुकची चर्चा सगळीकडे सुरु आहे. सोशल मिडियावर तिचा पांढरा ड्रेस चांगलाच व्हायरल झाला. 

चाहत्यांनी तिला क्वीन तसेच शाही अशा विविध उपमा दिल्या. तिने मेकअप आणि हेअरस्टाइलही अगदी साधी केली असल्याने लोकांना जास्त पसंतीस पडले. 

मॉडर्नपेक्षा पारंपरिक भारतीय पोषाख सुंदर दिसतो, असे नेटकरी म्हणत आहेत. प्रियांकाचे अनेक ट्रॅडिशनल लुक सध्या व्हायरल होत आहेत. 

Click Here