अभिनेत्रीने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नाची हिंट दिलीय.
प्राजक्ता गायकवाड मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिला खरी लोकप्रियता स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतून मिळाली.
प्राजक्ता सध्या चर्चेत आली आहे. ती लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जातंय.
प्राजक्ताने सोशल मीडियावर साडीतले फोटो शेअर करत लग्नावर भाष्य केलंय. त्यामुळे सध्या तिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगलीय.
प्राजक्ताने फोटो शेअर करत म्हटले, रिअल फॅक्ट…इंजिनिअरिंग झाल्यावर जॉब कधी लागणार ?????? वयात आल्यावर #लग्न कधी करणार ????? हे प्रश्न ठरलेले असतात….
प्राजक्ताची ही पोस्ट पाहून चाहत्यांना ती लवकर लग्न करणार असल्याचे वाटत आहे. पण याबद्दल ती स्वतः कधी खुलासा करते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.