मन धागा धागा जोडते नवा...!

पूजा सावंतचे निळ्या साडीतील फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय.

पूजा सावंत आज आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठीसह हिंदीतही पूजाने अभिनयाच्या जोरावर स्वतःची छाप उमटवली आहे.

पूजा अभिनयाबरोबरच तिच्या फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. पूजा तिच्या सौंदर्याने नेहमीच चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

नुकतेच पूजाने निळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय. साडीवर तिने फुल स्लिव्ह्जचा ब्लाउज परिधान केलाय.

पूजाने साडीवर कानात मोठे इअररिंग्स घातलेत आणि केस मोकळे सोडले आहेत. या साडीत ती खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

 पूजा सावंतने गेल्यावर्षी २८ फेब्रुवारीला सिद्धेश चव्हाणशी लग्न केले. तिचा पती कामानिमित्ताने ऑस्ट्रेलियात राहतो. त्यामुळे पूजा कधी ऑस्ट्रेलिया तर कधी मुंबईत असते.

Click Here