चिंब भिजलेले, रुप सजलेले...

अभिनेत्री पूजा सावंतने पावसात फोटोशूट केलंय, जे चर्चेत आलंय.

पूजा सावंत मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती अभिनयाशिवाय तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत येत असते.

नुकतेच पूजाने एक फोटोशूट केले आहे, जे चर्चेत आले आहे.

या फोटोशूटमध्ये पूजाने टेरेसवर निळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.

पूजाने निळ्या रंगाच्या साडीवर ग्रीन स्लीवलेज ब्लाउज परिधान केला आहे. साडीवर तिने कानात मोठे इअररिंग्स घातले आहेत.

पूजा सावंत साडीत खूपच छान दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

पूजा सावंतच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती आंबट शौकीन सिनेमात पाहायला मिळाली.

पूजा लवकरच कपबशी सिनेमात दिसणार आहे. यात मजेशीर कौटुंबिक कथा पाहायला मिळणार आहे.

Click Here