पराठे चवदार होण्यासाठी 'असा' तयार करा मसाला...

कोणत्याही प्रकारचे पराठे जास्त चवदार करायचे असतील तर पुढे सांगितलेल्या पद्धतीने मसाला तयार करा.

सगळ्यात आधी तर तव्यावर जिरे, धणे, ओवा, बडिशेप, लवंग, लाल मिरची आणि मिरे घालून चांगले भाजून घ्या.

मसाले भाजून झाल्यानंतर गॅस बंद करा आणि गरम तव्यावरच थोडा कडिपत्ता घालून तो ही चांगला भाजून घ्या.

भाजून घेतलेले सगळे पदार्थ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये घाला आणि त्याची पावडर तयार करून घ्या.

नंतर तयार झालेल्या मसाल्यामध्ये आमचूर पावडर, चाट मसाला, काळं मीठ, कश्मिरी लाल तिखट, कसूरी मेथी घाला. 

हा तयार झालेला मसाला तुम्ही एअर टाईट काचेच्या बरणीत १ महिना तरी साठवून ठेवू शकता.

कोणत्याही प्रकारचा पराठा करताना त्यात हा मसालाही घाला. बघा पराठ्यांना कशी मस्त चव येईल. 

Click Here