हार्ट ॲटॅक येण्याच्या महिनाभर आधी शरीरात दिसतात ५ बदल
कमी वयात हार्ट ॲटॅक येण्याचे प्रमाण सध्या खूप जास्त वाढलेले आहे. यामुळे प्रत्येकानेच आपापल्या तब्येतीबाबत जागरुक होणे गरजेचे आहे.
शेफाली जरीवालाचे नुकतेच हार्ट ॲटॅकने झालेले निधन सगळ्यांनाच चटका लावून गेले.
हार्ट ॲटॅक येण्याच्या काही दिवस आधी शरीरात काही बदल दिसायला सुरुवात होते, ते नेमके कोणते याची माहिती डॉक्टरांनी gethealthy.tips या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
त्यापैकी सगळ्यात पहिला बदल म्हणजे साधारण महिनाभर आधीच वारंवार नॉशिया झाल्यासारखं होतं.
शरीरातील रक्ताभिसरण क्रिया चांगल्याप्रकारे होत नसल्याने कायम थकवा जाणवतो. आराम झाल्यानंतरही अंगातला आळस जात नाही.
सतत डोकं दुखतं. कोणतंही ठोस कारण नसतानाही सतत डोकं दुखत असेल तर एकदा डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने शरीराची एक बाजू काही वेळा बधीर झाल्यासारखी होते किंवा वारंवार मुंग्या येतात.
नजर धुसर झाल्यासारखी वाटते. नजर लावून एखाद्या ठिकाणी पाहिल्यास डोळ्यांसमोर पांढरंट आल्यासारखं दिसतं. ही काही हार्ट ॲटॅकपुर्वी जाणवणारी लक्षणं असू शकता.
भागे रे मन...! डोक्यात सतत विचारांचा भुंगा? ७ सोपे उपाय, ओव्हिरथिंकिंग थांबेल, मन होईल शांत