आयपीएलमधील सर्वात वयस्कर कर्णधार!

आयपीएलमध्ये एखाद्या संघाचे नेतृत्व करणाऱ्या सर्वात वयस्कर पाच कर्णधारांबद्दल जाणून घेऊयात. 

चेन्नई सुपरकिंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे वय ४३ वर्षे आणि ३१७ दिवस इतके आहे. 

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेनवॉर्नने वयाच्या ४१ वर्षे २४९ व्या दिवशी राजस्थानच्या संघाचे नेतृत्व केले. 

विस्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक अॅडम गिलक्रिस्टने वयाच्या ४१ वर्षे १८५ व्या दिवशी आयपीएलमध्ये कर्णधारपदाची जबाबदारी पार पडली.

या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा तडाखेबाज फलंदाज फाफ डू प्लेसिस चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. फाफ सध्या ४० वर्षे ३१२ दिवसांचा आहे. 

राजस्थानचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या यादीत पाचव्या स्थानावर आहे. द्रविडने वयाच्या ४० वर्षे १३३ व्या दिवशी आयपीएलमध्ये नेतृत्व केले.

Click Here