लाल अनारकलीत खुललं निकीचं सौंदर्य

निक्की तांबोळीने नुकतेच एथनिक ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

निक्की तांबोळी हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बिग बॉस हिंदीनंतर ती बिग बॉस मराठीत झळकली होती.

बिग बॉस मराठीमधून निक्की तांबोळीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. ती चांगलीच चर्चेत आली होती. 

बिग बॉस मराठीच्या घरात तिची आणि अरबाज पटेलसोबतची केमिस्ट्री खूप चर्चेत आली होती.

सध्या निक्की शिट्टी वाजली रे या शोमध्ये पाहायला मिळत आहे. तिथे ती विनायक माळीसोबत विविध रेसिपी बनवताना दिसते आहे.

नुकतेच निकी तांबोळीने लाल रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. यात तिने एकापेक्षा एक दमदार पोझ दिल्या आहेत.

निक्कीने अनारकली ड्रेसवर मोठे इअररिंग्स परिधान केले आहेत आणि केस मोकळे सोडले आहेत.

निकीच्या या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे. 

Click Here