शरीरात जर साखर वर-खाली होणार असेल तर आधीच दिसतात ही लक्षणे. वेळीच ओळखता आली तर गोळी घ्यायची वेळ येणार नाही.
मधुमेहाचा त्रास आजकाल अनेकांना असतो. लहान वयातही डायबिटिस होतो. त्यामागे कारणे अनेक आहेत.
तज्ज्ञ सांगतात, मधुमेहाचा त्रास असाच सुरु होत नाही. काही महिने आधीच त्याची लक्षणे दिसायला लागतात. ती लक्षणे ओळखता आली तर वेळीच साखरेवर नियंत्रण मिळवता येते.
रक्तातील साखर वर-खाली झाली तर किडनीवर त्याचा ताण येतो. त्यामुळे लघवीला लागण्याचे प्रमाण वाढते.
तहान लागणे चांगले आहे. मात्र जर सतत घशाला कोरड पडत असेल, पाणी प्यायल्यावर मन भरत नसेल तर ते ही एक लक्षण ठरते.
व्यवस्थित जेवण असतानाही अचानक वजन कमी होते. डायबिटिसचा त्रास सुरु होण्याआधी वजन कमी होते.
सतत काहीतरी खाण्याची इच्छा होते. ब्लड लेवलही वर-खाली होत राहते. जेवल्यावरही समाधान मिळत नाही.
ग्लुकोजवर परिणाम झाल्यामुळे सतत थकवा जाणवतो. झोप येत राहते. काम कराताना चिडचिड होते.
डायबिटिसचा परिणाम डोळ्यांवरही होतो. दृष्टिवर त्याचा फार परिणाम होतो. नीट दिसत नाही. तसेच डोकं दुखतं.
डायबिटिस असेल तर एखादी जखम लवकर भरत नाही. अगदी कितीही लहान जखम असो ती भरायला भरपूर वेळ लागतो.
डायबिटिसचा त्रास झाल्यावर शरीरावर काळसर डाग दिसतात. हातावर तसेच मानेवर असे डाग दिसायला लागतात.