अभिनेत्री रिंकू राजगुरु आज ३ जूनला वाढदिवस साजरा करत आहे.
'सैराट' या अजरामर मराठी सिनेमातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरु आज ३ जूनला वाढदिवस साजरा करत आहे.
रिंकू राजगुरूला आजही अनेकजण 'सैराट'ची आर्ची म्हणूनच ओळखतात. पहिल्याच चित्रपटातून ती रातोरात लोकप्रिय झाली.
सैराटच्या शूटिंगवेळी रिंकू इयत्ता नववीत होती. इतक्या लहान वयात तिने अप्रतिम काम केले. रिंकू म्हणून अभिनेत्रीला जरी ओळख मिळाली असली तरी तिचं खरं नाव वेगळंच आहे.
रिंकूचं खरं नाव प्रेरणा महादेव राजगुरू आहे. रिंकू हे तिचे टोपणनाव आहे. रिंकूला प्रेरणा या नावाने कुणीच ओळखत नाही. सर्वजण तिला रिंकू या नावानेच हाक मारतात.