नेहाच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. नेहा सतत चर्चेत येत असते.
नेहा पेंडसे पहिल्यांदाच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकलीय. तिच्या तिथला लूक चांगलाच चर्चेत आला.
त्यानंतर आता नेहा फ्रान्सच्या रस्त्यावर फेरफटका मारताना दिसली. तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.
फोटोत नेहाने लाँग वन पीस परिधान केलाय. त्यावर केस मोकळे सोडले आहेत आणि गॉगलने लूक पूर्ण केलाय.
या फोटोत नेहा खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.