नेहा पेंडसे अभिनयाव्यतिरिक्त आपल्या ग्लॅमरस अंदाजामुळे चर्चेत येत असते.
मराठीसोबत हिंदी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे नेहा पेंडसे. नेहा अनेक गोष्टीमुळे सतत चर्चेत येत असते.
आतादेखील ती बोल्ड अंदाजामुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच तिने इंस्टाग्रामवर आणि इंस्टास्टोरीवर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
नेहा पेंडसेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
नेहा पेंडसे भाभीजी घर पर है मालिकेत अनिता भाभीच्या भूमिकेत पाहायला मिळाली होती. तसेच ती शेवटची जून या मराठी चित्रपटात झळकली.