नेहा खानच्या फोटोशूटनं वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष
नेहमीच बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोशूट करणाऱ्या नेहा खानने यावेळी हटके फोटोशूट केलंय.
यावेळी नेहा खान देसी अंदाजात पाहायला मिळाली. तिच्या या फोटोंनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, नववारी साडी आणि मराठमोळा साज श्रृंगारात अभिनेत्रीने फोटोशूट केलंय.
नेहाने हातात सितार पकडलेली दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये तिच्या हातात कमळदेखील पाहायला मिळत आहे.
या फोटोंमध्ये नेहा खान खूपच अप्रतिम दिसत आहे. तिच्या सौंदर्यावर नेटकरी घायाळ झाले आहेत.
नेहा खानच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
कुणी तिला देवीची, अप्सरेची, मीरा बाईची तर कुणी सरस्वती देवीची उपमा दिली आहे.
नेहा खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती 'बाई गं' सिनेमात झळकली होती. आता ती 'तेरा यार हूँ मैं' या हिंदी सिनेमात झळकणार आहे.