अभिनेत्री नेहा खान हिने नुकतेच फोटोशूट केले आहे. यात तिने पारंपारिक लूक केलाय.
अभिनेत्री नेहा खान मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. नुकतीच ती बाई गं या सिनेमात दिसली होती.
नेहा खान सिनेमाव्यतिरिक्त ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच नेहाने पारंपारिक फोटोशूट केले आहे.
नेहा खानने हिरव्या रंगाची नववारी साडीत फोटोशूट केलंय. तिने गळ्यात नेकलेस घातला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत.
नेहा खानच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
नेहा खानने शिकारी या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. तिने साउथ इंडस्ट्रीतून करिअरची सुरूवात केली होती.
तिने मालिकेतही काम केलंय. देवमाणूस २मध्ये ती काम करताना दिसली होती.