नीरज चोप्रा बनला लेफ्टनंट कर्नल!

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रावर भारतीय लष्करात नवी जबाबदारी सोपवण्यात आली.

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राची भारतीय लष्करात पदोन्नती करण्यात आली आहे.

भारताच्या भालाफेकपटूला आता प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद पदवी देण्यात आली. 

नीरज चोप्रा हा आधीच भारतीय सैन्यात सुभेदार म्हणून कार्यरत होता.

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये नीरजने ८७.५८ मीटर भालाफेक करून देशाला सुवर्णपदक जिंकून दिले.

नीरज चोप्रा ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकणारा भारतातील पहिला खेळाडू आहे. 

यानंतर, त्याने २०२४ च्या पॅरिस ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकले.

Click Here