नेलपॉलिशचे काही शेड्स कोणत्याही आऊटफिट, खास प्रसंग किंवा सीझनसोबत अगदी सहज मॅच होतात.
दिवसेंदिवस फॅशन बदलत असली तरी नेलपॉलिशचे काही रंग असे असतात जे कायम एव्हरग्रीन, स्टायलिश आणि एलिगंट दिसतात.
असे क्लासिक आणि एव्हरग्रीन नेलपॉलिशचे रंग नेमके कोणते आहेत ते पाहूयात.
नेलपॉलिशचा कार्डिनल रेड हा हलकासा लाल रंग हातांचे सौंदर्य अधिकच खुलवतो.
चॉकलेट ब्राऊन रंगाची नेलपॉलिश कधीही आऊट ऑफ फॅशन जात नाही, हा रंग नखांवर अधिकच खुलून दिसतो.
न्यूड शेड तुमच्या त्वचेच्या रंगाच्या जितका जवळ असेल, तितकं त्याचं रूप अधिक नैसर्गिक आणि सुंदर वाटेल.
इंटेन्स ब्लॅक म्हणजेच काळ्या रंगाच्या नेलपॉलिश शेडमुळे नखांना एक खास उठावदार लूक मिळतो.
बर्गंडी रंग हातांना एक खास आकर्षण आणि भारदस्तपणा देतो. हा रंग नखांना केवळ उठावच देत नाही, तर एलिगंट लूकही देतो.
क्लेन ब्लू हा नेलपॉलिशचा रंग तुमच्या नखांना अतिशय सुंदर लूक देतो. हा रंग कधीही आऊट ऑफ फॅशन जात नाही.
नेव्ही ब्लू रंगाची शेड्स क्लासिक स्टाईलचं उत्तम उदाहरण आहे, नेव्ही ब्लू नेलपॉलिश शेड्स नखांवर खूप सुंदर दिसतो.
मिल्की व्हाईट रंग नेहमीच ट्रेंडमध्ये असणाऱ्या नेलपॉलिश शेड्सपैकी एक आहे. हा रंग अत्यंत साधा वाटतो, पण त्याच्यात एक खास फ्रेशनेस असतो.
नेलपॉलिशचा बेबी पिंक रंग कधीही आऊट ऑफ फॅशन जात नाही. हा रंग हातांना चमकदार आणि कोमल लुक देतो.