हिवाळ्यात मोहरीच्या तेलात सैंधव मीठ घालून लावण्याचे फायदे 

हिवाळ्याच्या दिवसांत मोहरीच्या तेलात सैंधव मीठ घालून अंगाला मालिश करून पाहाच.. 

हिवाळ्याच्या दिवसांत मोहरीच्या तेलात सैंधव मीठ घालून लहान मुलांच्या तळपायांना, तळहातांना, छातीला मालिश केली जाते. त्यामुळे अंगात ऊब राहाते.

सैंधव मिठामध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे शरीरातली मॅग्नेशियमची पातळी वाढण्यासाठी हा उपाय उपयुक्त ठरतो.

हा उपाय केल्यामुळे स्नायूंच्या वेदना, जॉईंटपेन कमी होतात.

सैंधव मिठामुळे मोहरीच्या तेलामधल्या गुणधर्मांचा त्वचेला फायदा होतो आणि त्यामुळे त्वचाही छान होते.

या उपायामुळे त्वचेमधलं रक्ताभिसरण व्यवस्थित होतं आणि त्यामुळे थकवा कमी होतो.

हिवाळ्यात त्वचा मॉईश्चराईज ठेवण्यासाठीही मोहरीचं तेल आणि सैंधव मीठ फायदेशीर ठरतं. 

Click Here