बदलत्या वातावरणात खा ६ पौष्टिक फळे 

 थंडीच्या वातावरणात खा ही चविष्ट फळे. कारण आरोग्यासाठी ठरतात वरदान. 

बदलत्या वातावरणात शरीराला गरज असते ती रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची. अशावेळी आहार फारच महत्वाचा असतो. काही फळे आरोग्यासाठी वरदान ठरतात. 

जसे की संत्री. शरीराला दिवसभरासाठी जीवनसत्त्व 'सी'ची गरज असते. संत्र्यातून मोठ्या प्रमाणात हे जीवनसत्त्व मिळते. 

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पेरु एकदम चांगला. तसेच तोंडाची काळजी घेण्यासाठीही उत्तम असतो. 

किवी हे फळ बाराही महिने खायला हवे. त्यात जीवनसत्वे, फायबर, अँटी ऑक्सिडंट्स सारेच मोठ्या प्रमाणात असते. 

शरीरात बॅक्टेरिया वाढू नये यासाठी डाळिंब खावे. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. तसेच विविध पोषणही मिळते. 

गट हेल्थसाठी सफरचंद आरात असायलाच हवे. सफरचंद तर बाराही महिने खावे. 

पपई उष्ण असते म्हणून अनेकजण खाणे टाळतात. मात्र हे फळ, पचन आणि त्वचेसाठी फार पोषक असते. 

Click Here