'मुरांबा' मालिकेतील रमा उर्फ शिवानी मुंढेकर ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे मुरांबा. मुरांबा मालिकेला कमी कालावधीत चांगलीच लोकप्रियता मिळाली.
मुरांबा मालिकेतील रमा आणि अक्षयची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. रमाची भूमिका शिवानी मुंढेकर हिने साकारलीय.
शिवानी मुंढेकरची मुरांबा ही पहिलीच मालिका आहे. तिने या मालिकेतून रसिकांच्या मनात घर केले आहे.
शिवानी मुंढेकरचे या मालिकेनंतर फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ झालीय.
शिवानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते.
शिवानीने नुकतेच लाल साडीत केलेले फोटोशूट नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे.