झाडं जिवंत असली तरी जागा बदलत नाहीत, काेणत्याही प्रकारचा आवाज काढत नाहीत, पण, तरीही झाडं एकमेकांशी संवाद साधतात.
झाडं एकमेकांपासून दूर उभी असली तरी ती एकमेकांच्या संपर्कात असतात. जंगलातल्या झाडांच खास नेटवर्किंग असतं, हे माहिती आहे का तुम्हाला?
झाडांचा संवाद आवाजाने नाही, तर जमिनीखालील मुळं आणि फंगस नेटवर्कमधून होतो. शास्त्रज्ञांनी यालाच नाव दिलंय Wood Wide Web.
फंगस (Mycorrhiza) हे मुळापाशी असतात आणि फंगस मुळांपाशी एक विशाल जाळं तयार करतात. हे जाळं म्हणजे झाडांचं इंटरनेट.
जंगलात किंवा आजू बाजूला असणाऱ्या झाडांपैकी एका झाडाला आजार झाला तर ते शेजारच्या झाडांना रासायनिक सिग्नल्स पाठवतं, सावध राहा.
मोठी झाडं लहान झाडांना सूर्यप्रकाश कमी मिळाला तरी पोषकतत्त्वं शेअर करतात. निसर्गातील खरी मदत इथे दिसते.
वेगवेगळ्या प्रजातींची झाडंही एकमेकांना इशारे देतात. उदा. कीटकांचा हल्ला सुरू झाला. तर शेजारची झाडं संरक्षणासाठी रसायनं तयार करतात.
हे नेटवर्क इतकं प्रभावी आहे की, एका जंगलातल्या झाडांच्या आरोग्याचं भविष्य या जाळ्यावर अवलंबून असतं.
शास्त्रज्ञ Suzanne Simard यांनी १९९० च्या दशकात हे रहस्य उलगडलं. त्यांनी दाखवलं की Mother Trees संपूर्ण जंगलाला जोडून ठेवतात.
मानवांना दिसत नसले तरी ही अदृश्य नाळ संपूर्ण जंगलाला जिवंत ठेवते. म्हणूनच जंगल म्हणजे फक्त झाडांचा समूह नाही, तर एक कुटुंब आहे.