६२ व्या वर्षीही सौंदर्यांत बॉलिवूड अभिनेत्रींना देतेय टक्कर
२०२५ मध्ये जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब हा ६२ वर्षीय महिलेला मिळाला आहे.
ही महिला म्हणजे हॉलिवूड अभिनेत्री डेमी मूर. तिने जगातील सर्वात सुंदर महिला म्हणून किताब पटकावलाय.
डेमीने वयाच्या ६२व्या वर्षी जगातील सर्वात सुंदर महिलेचा किताब जिंकून सर्वांना धक्का दिला आहे.
डेमी मूरने आपल्या सौंदर्य आणि स्टाईलने संपूर्ण जगाला वेड लावले आहे. तिच्या स्टायलिश लूकने सर्वांची मने जिंकली आहेत.
डेमी मूर सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. तिचे फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असतात.
डेमी मूर हिने १९८१ साली रिलीज झालेल्या चॉइसेस सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले.
डेमी मूरने अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.
या यादीत 'द सेव्हन्थ साइन', 'द सबस्टन्स', 'प्लीज बेबी प्लीज', 'सॉन्गबर्ड' आणि 'ब्लाइंड' यासारख्या चित्रपटांचा समावेश आहे.