पाऊस आला, मूगभजीचा बेत होऊन जाऊ द्या!

चहासोबत नाश्त्यासाठी करा मूग भजी. झटपट रेसिपी कुरकुरीत खमंग. 

पावसाळा आला की चहा, भजी, वडा असे पदार्थ घरोघरी केले जातात. भजीमध्ये विविध प्रकार असतात. त्यातील एक म्हणजे मूग भजी. अगदी सोपी आणि कुरकुरीत अशी ही भजी घरी नक्की करा. तेलही कमी पिते. 

मूग डाळ किमान सहा तास तरी भिजवावी लागते.  त्याशिवाय भजी चांगली होत नाही. रात्रीच मूग भिजत घालायचे.

एक कांदा छान बारीक चिरुन घ्यायचा. हिरवी मिरची चिरुन घ्यायची. कोथिंबीरही चिरुन घ्यायची. 

भिजवलेली मूग डाळ वाटून घ्यायची. अगदी दोन चमचे पाणीच घ्यायचे. जाडसर घट्ट डाळ वाटायची. 

कढईत तेल तापत ठेवायचे. तेल तापल्यावर चमच्याने लहान लहान भजी सोडायची. मस्त कुरकुरीत तळून घ्यायची.

आवडत्या चटणीशी लावा सॉससोबत खा. चवीला फार छान लागते. 

Click Here