पृथ्वीवर भूकंप हाेतात, हे सगळ्यांना माहिती आहे. पण, चंद्रावरही असे भूकंप हाेतात, याविषयी तुम्हाला काही माहिती आहे का?
NASA च्या Apollo मोहिमेत चंद्रावरही भूकंप हाेत असल्याचा शाेध लागला आहे. Moon quakes चे वेगळे प्रकार आहेत.
Apollo 12, 14, 15 आणि 16 मिशन दरम्यान चंद्रावर seismometers ठेवले गेले. यातून चंद्र जिवंत असून तिथेही हालचाली हाेतात, असे दिसले.
चंद्राच्या पृष्ठभागाखाली होणारे हलके ते तीव्र कंप. हे तासन्तास चालू राहू शकतात, यालाच Moonquakes म्हणतात.
Moonquakes चे ४ प्रकार आहेत. Deep moonquakes, Shallow moonquakes,Thermal quakes, Meteor impact quakes
Shallow moon quakes हे रिश्टर स्केलवर ५ पर्यंत शक्तीचे असू शकतात. त्यामुळे हे धाेकादायक मानले जातात.
Thermal moon quakes म्हणजे चंद्रावर दिवस रात्रीच्या तापमानात खूप फरक असताे, यामुळे पृष्ठभागाला तडे जाऊन कंप निर्माण हाेताे.
उल्का आदळल्यावर Moon quakes होतात. चंद्रावर वातावरण नसल्यामुळे लहानसहान उल्का थेट चंद्रावर आदळतात.
NASA च्या मते काही moon quakes १०-१५ मिनिटे नव्हे तर तासन्तास चालू राहू शकतात. पृथ्वीवरील भूकंप काही सेकंदात थांबतात.