चाट खायला आवडत असेल तर ही रेसिपी नक्की करुन पाहा. करायला अगदी सोपी आहे. चव भारी.
चाट म्हणजे कधीही आणि कितीही खाल्ले तरी मन भरत नाही. चाटचे अनेक प्रकार असतात. घरी करता येणारे काही प्रकार झटपट होतात.
एकदा बटाटा चाट नक्की करुन पाहा. उकडलेल्या बटाट्याची एकदम चविष्ट आणि भारी अशी ही रेसिपी आहे.
साहित्य - बटाटा, चिंच पाणी, आलं, लसूण, कोथिंबीर, पुदिना, चाट मसाला, लाल तिखट, कांदा
बटाटे उकडून घ्यायचे. उकडलेला बटाटा सोलून घ्यायचा आणि त्याचे चौकोनी तुकडे करायचे.
एका मिक्सरच्या भांड्यात थोडा पुदिना, कोथिंबीर, लसणाच्या काही पाकळ्या आणि आल्याचा तुकडा घ्यायचा. वाटून छान चटणी तयार करायची.
एका ताटलीत बटाटा घ्यायचा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा. चिंचेची चटणी घालायची. तसेच चाट मसाला घालायचा.
तयार केलेली हिरवी चटणी घालायची. वरतून लाल तिखट आणि मीठ भुरभुरायचे. चवीला एकदम मस्त लागते.