हॉटेलातील ६ महागडे स्टार्टर, घरी करा झटपट

हॉटेलपेक्षा भारी पदार्थ करा घरीच. चवीला मस्त होतीलही झटपट. 

हॉटेलमध्ये गेल्यावर पहिले स्टार्टरर्स मागवले जातात. त्याशिवाय पुढचे पदार्थ आजकाल कोणी खात नाही. ते पदार्थ चवीला छान असतातच पण आपल्याला करायला कठीण वाटतात. 

लहान मुलं आवडीने जे स्टार्टरर्स खातात , त्या रेसिपी घरी करायला सोप्या आहेत. पाहा कोणते स्टार्टर घरी करता येतील. 

चनाकोळीवाडा हा फार प्रसिद्धी असा स्टार्टर आहे. तो घरी करायला फारच सोपा आहे. फक्त बेसन, मैदा, काबुली चण्यांचा वापर करायचा असतो. 

पनीर ६५ हा पदार्थ आपण अगदी आवडीने खातो. पनीर ६५ हा पदार्थ घरी करायला सोपा आहे. घरी केलेले पनीर जास्त चांगले लागेल.

लहान मुलांना अगदी आवडता स्टार्टर म्हणजे मसाला पापड. हॉटेलात १५० ला मिळणारा मसाला पापड घरी दहा मिनिटांत करता येतो. 

चीज बॉल्स हा पदार्थ खाल्ला आहे का? भरपूर चीज घालून तयार केलेली भजीच ती. घरी करायला अगदीच सोपी रेसिपी आहे. 

गार्लिक ब्रेड आजकाल सगळीकडेच प्रचंड महाग विकला जाणारा पदार्थ आहे. साध्या ब्रेडचा वापर करुन घरीच तयार करायचा. जास्त खुसखुशीत होईल. 

हराभरा कबाब गेली अनेक वर्षे मेन्यूमध्ये टॉपला आहे. पालक, मटार, कोबी, बेसन, मैदा अशा पदार्थांच्या मिश्रणातून तयार झालेला हा पौष्टिक पदार्थ घरी करायला अगदीच सोपा. 

Click Here
Click Here