पाच मिनिटांत 'असे' करा शेंगदाणा चाट

शेंगदाणा चाट करायला एकदम सोपे आणि चवीला जबरदस्त. पाहा कसे करायचे. 

चाटचे अनेक पदार्थ असतात. जे घरी करता येतात मात्र त्यासाठी फार खटाटोप असतो. मात्र हा पदार्थ अगदी काही मिनिटांत करता येतो. 

घरी असलेले शेंगदाणे वापरुन मस्त चाट तयार करता येते. रेसिपी अगदीच सोपी आहे. पाहा काय करायचे. 

शेंगदाणे सोलून घ्यायचे. भाजायचे आणि सोलायचे. नंतर एका पॅनमध्ये चमचाभर तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात लाल तिखट घाला आणि त्यावर शेंगदाणे परता. 

मस्त खमंग परतायचे. छान लाल दिसायला हवेत. नंतर परतलेले दाणे एका खोल पातेल्यात घ्यायचे. त्यात अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा. 

तसेच बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. पिवळी शेवही घालायची. लिंबाचा रस घालायचा आणि चवी पुरते मीठ घालायचे. 

एका मिक्सरच्या भांड्यात थोडी कोथिंबीर घ्या, त्यात हिरवी मिरची घाला, लसूण, आलं घ्या. थोडा पुदिना घ्यायचा आणि पेस्ट वाटायची. 

तयार मिश्रणावर थोडी पेस्ट ओतायची. चाट एकजीव करा. चमच्याने ढवळून घ्यायचे. चवीला फारच मस्त लागते. 

Click Here