ओठ नेहमीच काेरडे वाटत असतील तर त्याच्यामागे पुढे सांगितलेली काही कारणं असू शकतात.
ओठं कोरडे पडणं हे डिहायड्रेशनचं एक लक्षण आहे. त्यामुळे तुम्ही पाणी पुरेशा प्रमाणात पित आहात का हे एकदा तपासून घ्या.
ओठ कोरडे पडल्यानंतर आपण त्यावर लिप बाम लावतो. पण तरीही ओठांचा कोरडेपणा कमी होत नसेल तर पाणी भरपूर प्रमाणात प्यायला हवं.
ओठ कोरडे पडण्यासाेबतच युरिनचा रंग डार्क पिवळा असणं, थकवा येणं, तोंड कोरडं पडणं अशी लक्षणंही जाणवत असतील तर तो डिहायड्रेशनचाच प्रकार आहे.
जे लोक जास्त काळ एसीमध्ये बसतात त्यांनाही बऱ्याचदा एसीचं थंड वारं सहन होत नाही आणि मग ओठ कोरडे पडतात.
जर भरपूर पाणी पिऊनही ओठांचा कोरडेपणा कमी होत नसेल तर त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.