या 'ड्रायफ्रूट'चे फायदे वाचाल तर काजू-बदामही विसराल...

जाणून घ्या... सेवन करण्याची पद्धत

 वजन नियंत्रण 
मखान्यामध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे वारंवार भूक लागत नाही, चयापचय वाढण्यास मदत होते ज्यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो. 

 रक्तातील साखरेचे नियंत्रण
मखान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे ते मधुमेहाच्या रुग्णांसाठी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 

 पचन सुधारते 
फायबर युक्त असल्याने मखाने पचन सुधारण्यास आणि बद्धकोष्ठता दूर ठेवण्यास मदत करतात. 

 त्वचेसाठी फायदेशीर
मखान्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात,ज्यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि त्वचा तरुण व चमकदार राहण्यास मदत होते. 

 ऊर्जा वाढते
दूध आणि मखाने एकत्र खाल्ल्यास शरीराला भरपूर कॅल्शियम आणि ऊर्जा मिळते, ज्यामुळे अशक्तपणा कमी होतो आणि ऊर्जा वाढते. 

 हाडे मजबूत होतात
मखान्यांमध्ये कॅल्शियम असल्याने ते हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहे. 

 डायबिटीसमध्ये फायदेशीर
मखान्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.ज्यामुळे मखाने डायबिटीसच्या रूग्णांसाठी सुरक्षित असतात.

 ताण-तणाव कमी होतो
मखान्यांमधील मॅग्नेशियम ताण-तणाव कमी करते,रात्री झोपण्याच्या आधी दुधात मखाने घालून खाल्ल्यानं काही दिवसांतच तुम्हाला फरक दिसून येईल.

 मखाना खाण्याची योग्य वेळ कोणती?वजन कमी करण्याच्या आहारात सकाळच्या नाश्त्यासाठी,संध्याकाळी हलक्या जेवणासाठी  मखान्याचा समावेश करू शकता.

Click Here