६ महिन्यांच्या विक्रीने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.
Mahindra ने गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय ग्राहकांच्या मनात एक आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. दर महिन्याला होणाऱ्या विक्रीच्या आकडेवारीवरुन हे दिसून येते.
कंपनी SUV सेगमेंटम आघाडीवर आहे. इतर कंपन्या हळूहळू डिझेल गाड्या बंद करत असताना, महिंद्राने त्यांचे डिझेल मॉडेल्स कायम ठेवण्यासोबतच विक्रीचे नवीन विक्रम केले आहेत.
महिंद्राची SUV विक्री आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ५,५१,४८७ युनिट्सवर पोहोचली, जी आर्थिक वर्ष २४ मधील ४,५९,८७७ युनिट्सच्या तुलनेत सुमारे २०% वाढ दर्शवते.
यापैकी ४,२५,३२९ युनिट्स डिझेल वाहने होती. तर, पेट्रोल व्हेरिएंटचे १,१३,२६८ युनिट्स विकले. याशिवाय, EV सेगमेंटमधील १२,८९० युनिट्सची विक्री झाली.
महिंद्राच्या पेट्रोल विक्रीत सर्वात मोठा वाटा XUV 3XO चा होता. याच्या 69,496 युनिट्स विकल्या गेल्या. ही एकमेव SUV होती ज्याला डिझेलपेक्षा जास्त मागणी होती.
त्यानंतर XUV700 ची 22,910 आणि स्कॉर्पिओ N ची 11,447 पेट्रोल युनिट्स विकली गेली. थार आणि थार रॉक्सची विक्री अनुक्रमे 3,235 आणि 6,180 युनिट्स होती.
डिझेल सेगमेंटमध्ये आर्थिक वर्ष 2025 मध्ये 1.5 लाखांहून अधिक डिझेल स्कॉर्पिओ SUV विकल्या गेल्या, जे कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या डिझेल मॉडेल्सपैकी एक आहे.
थारच्या एकूण विक्रीपैकी ९३% विक्री डिझेल व्हर्जनमधून झाली, तर थार रॉक्सच्या व्हेरिएंटमध्ये डिझेलचा वाटा सुमारे ८४% होता.
या आकडेवारीवरून स्पष्ट होते की महिंद्रा अजूनही डिझेल सेगमेंटमध्ये वर्चस्व गाजवत आहे आणि ग्राहकांमध्ये त्याची पकड खूप मजबूत आहे.