चांगले संगीत ऐकणे आरोग्यासाठी ठरते फायद्याचे. शरीरावर 'असा' होतो परिणाम
संगीत ऐकणे हा फक्त छंद नाही, तर ती एक प्रकारची थेरपी असते. मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी हा एक प्रभावी पर्याय आहे.
ट्रेस हार्मोन्स कमी करण्यात संगीत मदत करते. डोक्यातील ताण कमी करुन लक्ष वळवण्यात मदत करते.
कोणत्याही कारणाने खराब झालेला मुड सुधारण्यासाठी संगीत फायद्याचे असते. आनंदाची भावना जागृत करण्यासाठी मदत करते.
घाबरल्याने किंवा ताणामुळे वाढलेले हृदयाचे ठोके सुरळीत करण्यासाठी गाणी ऐकणे फायद्याचे ठरते.
शांत संगीतात शांत झोप न लागणाऱ्या माणसालाही गाढ झोपवण्याची ताकद असते.
डोक्यात असलेला विचारांचा कल्लोळ कमी करण्यासाठी आणि डोकं शांत करण्यासाठी संगीत फायद्याचे ठरते.