मधुबनी साड्यांची सध्या चांगलीच क्रेझ असून लग्नसराईमध्ये तुम्ही मधुबनी साडी नेसून सुंदर लूक करू शकता.
मधुबनी कला ही अतिशय प्राचीन असून ती मुळची बिहारमधील मिथिला प्रांतातली आहे. तिच्या वेगळ्या रेखाटनशैलीमुळे ती ओळखली जाते.
कॉटन किंवा सिल्क प्रकारातही मधुबनी साड्या मिळतात. दोन्ही प्रकारातल्या साड्या अतिशय आकर्षक वाटतात.
कॉटन मधुबनी साडी तर तुम्ही ऑफिसवेअर म्हणूनही वापरू शकता. यामुळे खूप छान लूक मिळतो..
सिल्क प्रकारातल्या मधुबनी साड्या लग्नसराईतल्या एखाद्या समारंभात घालायला एक उत्तम पर्याय ठरू शकतो..
मधुबनी प्रिंट असणाऱ्या ब्लाऊजलाही खूप मागणी आहे. ते ब्लाऊज तुम्ही कोणत्याही प्लेन रंगाच्या साडीवर घालू शकता..