२००२ मध्ये तिचे 'कांटा लगा' गाणे प्रसिद्ध झाले होते. या गाण्यातील तिच्या डान्सने, तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली.
शेफाली जरीवालाने आपला अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती.
'कांटा लगा' फेम गर्ल शेफाली जरीवाला हिचे नुकतेच निधन झाले आहे.
शेफालीने निधनाच्या काहीच दिवस आधी फोटोशूट केलेले तिने आपले ग्लॅमरस फोटो सोशल मिडीयावरही शेअर केले होते.
शेफालीने २४ जून २०२५ रोजी तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून तिचा फोटोशूट अल्बम शेअर करत आपली शेवटची पोस्ट शेअर केली.
नम्रता जोशीपूरा या डिझायनरने डिझाईन केलेल्या सिल्व्हर आऊटफिटमध्ये ती अगदी सुंदर दिसत होती.
बोल्ड अँड ब्युटीफुल आऊटफिट्स घालत तिने फोटोशूटसाठी एक से बढकर एक सिजलिंग पोझ दिल्या होत्या.
फोटोशूट दरम्यान पोझ देताना ती तिच्या प्रत्येक फोटोमध्ये अगदी कॉन्फिडंट दिसत आहे.
अखेर, वयाच्या ४२ व्या वर्षी मुंबईतील तिच्या घरी अचानक हार्ट अटॅक आल्यामुळे तिचं निधन झालं, ज्याने संपूर्ण बॉलिवूड आणि चाहत्यांना हादरवून टाकलं