जोस बटलर प्लेऑफ आधीच मायदेशी परतणार असल्याने गुजरातला मोठा धक्का बसला आहे.
गुजरात टायटन्सला मोठा दणका बसला असून संघाचा स्टार फलंदाज जोस बटलर आयपीएलच्या उर्वरित सामन्यात खेळणार नाही.
भरवशाचा खेळाडू असलेला विकेट किपर बॅटर जोस बटलर प्लेऑफ्सच्या लढतीआधीच मायेदशी परतणार आहे.
इंग्लंडचा संघ घरच्या मैदानात वेस्ट इंडिज विरुद्ध मर्यादीत षटकांची मालिका खेळणार असल्याने बटलर मायदेशात जाणार आहे.
बटलरच्या जागी गुजरात टायटन्सच्या संघाने बदली खेळाडूच्या रुपात श्रीलंकेच्या कुसल मेंडिस याला संघात सामील करून घेतले.
गुजरातचा संघ आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेत १६ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.